Wednesday, August 24, 2011

सर्वपक्षीय बैठक निष्फळ

आज अण्णांच्या उपोषणाचा दहावा दिवस. तरीही ह्या भ्रष्ट सरकारला अजून जाग आली नाही. काल सर्वपक्षीय बैठकीत ३ मुद्द्यांवर एकमत होऊ शकले नाही. एकीकडे सर्वे पक्षांनी अण्णांना पाठींबा द्यायचा आणि लोकपालाबाबत निरीच्छेचे धोरण करायचे असे हे इतर पक्ष करत आहेत.
त्यांची पण बुद्धी कॉंग्रेस सारखी भ्रष्ट झाली आहे. उद्या जर अण्णांना की झाले तर देशभर दंगली उसळतील. आज सर्वे जनता अण्णांच्या मुळे शांत आहेत. ते हिंसक बनतील. हा साधा विचार नालायक सरकारने केला पाहिजे.

Wednesday, July 20, 2011

मनोगत

नमस्कार, बरयाच दिवसांनी काहीतरी लिहाव असे म्हणत होतो पण तसा योग आजच जुळून आला.
आणि हि तर ब्लोग वरील पहिलीच पोस्ट आहे.
आला जवळजवळ चार-साडेचार वर्षे झाली मायदेश सोडून, तसे सात-आठ महिन्यांनी जातच असतो. पण
आता या सर्वे गोष्टीचा उबग आला आहे. असे वाटते सर्वे सोडावे आणि निघावे सरळ भारतात.
असाच मनात १ विचार आला. माझ्यासारखे कितीतरी लोक भारत सोडून बाहेर कामे
करतात. आणि आपले ज्ञान दुसऱया देशाला वाटतात. पण मित्रानो असी हे वेळ का यावी आपल्यावर?
याचाच विचार करतोय. आपल्या देशातील नाकर्ते राजकारणी, सगळीकडे होणारे बॉम्बस्फोट पाहून
आपल्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चीड निर्माण होते. आणि जर हा ज्ञानाचा झरा जर आपल्या देशात
वाहला असता, तर नक्कीच आपण विकसित राष्ट्र झालो असतो. या सर्वे जर तर च्या गोष्टी आहेत.
आता खरी गरज आहे ती आपले ज्ञान आपल्या देशाच्या विकासाला लावण्याची...
मग आपला देश महासत्ता होईल तो दिवस दूर नाही......
आपला मित्र
गणेश सावंत